निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे परिसरातील महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथ घोरपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील प्रा. रामकुमार सावंत उपस्थित होते.
संघाचे उपाध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले.
प्रा. रामकुमार सावंत यांनी, सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुलेनी शिकवून पुण्यात भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. त्यामुळेच देशात महिलांना शिक्षण घेवून विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली.
सध्या केरळ मधील १४ पैकी ९ जिल्ह्यात महिला जिल्हाधिकारी आहेत हे महिलांच्या उतुंग भरारीचे उदाहरण आहे. महिलांना जर घरात सन्मान मिळाला, त्यांना योग्य संधी दिली तर ती हाती घेतलेल्या क्षेत्रात विशेष कामगिरी करू शकतात. महिलांना अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी शासन देत आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कोरोना काळात २४ तास वैद्यकिय सेवा बजावल्याबद्दल श्रीनगरमधील डॉ. प्रिया अभिजीत पाटील यांचा तर संघाचे अध्यक्ष रघुनाथ घोरपडे यांची कागल तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीचे संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त केले. सेक्रेटरी अशोक तोडकर यांनी सूत्रसंचालन तर खजिनदार मल्लापा चौगुले यांनी आभार मानले.
कार्यक्रमास मारुती ठाणेकर, रसूल मुल्लानी, आर. एम. चौगुले, जयसिंग चौगुले, शालन देसाई, सुगंधा पाटील, शालन तोडकर, मंजुळा चौगुले, विद्या बडवे, सविता चौगुले, बाळाबाई कांबळे, आदिती जोशी, कल्पना लोहार, शिल्पा चौगुले, वर्षा जाधव, ज्योती घोरपडे, सावित्री कांबळे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta