
कार्यकर्त्यांचा गर्दीचा उच्चांक : मतदार संघाच्या विकासासाठी रिंगणात
निपाणी : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारपासून (ता.१२) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी (ता.१३) सकाळी बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह येथील शासकीय विश्रामगृहावर आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी जी. एन. मंजुनाथ यांच्याकडे दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांचा गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.
अशोक नगर मधील आपल्या कार्यालयापासून प्रचंड जनसमुदायासह शहरातील विविध मार्गावरून शक्तिप्रदर्शन करत उत्तम पाटील यांनी शासकीय विश्रामगृह गाठले. यावेळी उत्तम पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीला माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, अशोककुमार असोदे, अरुण निकाडे, रशीद बावा यांनी सूचक म्हणून काम केले. तर धनश्री उत्तम पाटील यांच्या अर्जासाठी नगरसेवक रवींद्र शिंदे, अनिस मुल्ला, शांता सावंत, अनिता पठाडे यांनी सूचक म्हणून काम केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देऊन परिसर दळण सोडला.
———————————————————–
मतदार संघाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात
बेळगाव जिल्ह्यात बेळगाव शहरानंतर निपाणी हे मोठे शहर आहे. आतापर्यंत शहरासह मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आपण बंडखोर नसून कोणत्याही पक्षाला विरोध करण्यासाठी नसून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत. यापूर्वी काळात मतदारसंघाच्या विकासासाठी भर देणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले.
यावेळी रावसाहेब पाटील (दादा), अभिनंदन पाटील, शुभांगी जोशी, नगरसेवक संजय सांगावकर, निरंजन पाटील-सरकार, गजानन कावडकर, सुभाष शेट्टी, अभय मगदूम, मनोज पाटील, आशिष खोडबोले, इम्रान मकानदार, शिरीष कमते, मधुकर पाटील,फारुख मुजावर, मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, प्रदीप माळी, नम्रता कमते, अनिता पठाडे, संजय पावले, शेरूरू बडेघर, दत्ता नाईक, शौकत मनेर, बाळासाहेब सातपुते, चेतन स्वामी, प्रकाश गायकवाड, राजू पाटील-अकोळ, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, अरुण जाधव दीपक सावंत, दिलीप पठाडे, शशिकांत गोरवाडे, गजानन शिंदे, के. डी. पाटील यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
————————————————————-
एकमेकांना नमस्कार
उत्तम पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आले. त्याचवेळी माजी आमदार काकासाहेब पाटील हे उमेदवारी अर्ज आणण्यासाठी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, पंकज पाटील यांच्यासह शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी दोन्ही उमेदवारांची समोरासमोर भेट झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना नमस्कार केले.
———————————————————–
उमेदवारासोबत केवळ चारच कार्यकर्ते
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणापासून शंभर मीटर आवारात कार्यकर्त्यांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्ते दूरवर उभे होते. शिवाय उमेदवाराबरोबर चारच जणांना अर्ज भरण्याच्या ठिकाणी परवानगी दिली. नियमाप्रमाणे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना मंडल पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी उमेदवार उत्तम पाटील यांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
Belgaum Varta Belgaum Varta