निपाणी : निपाणी व निपाणी ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. भिवशी नांगणूर ता.निपाणी येथे आं, भि, रा, युवक मंडळ यांच्या वतीने 132 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सकाळी 8 वाजता माणगाव येथून क्रांतीज्योतीचे आगमन झाले. व तसेच 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे ग्राम पंचायत सदस्य महादेव कांबळे व विविध मान्यवर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच दीक्षा कांबळे यांनी बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा व भारतीय संविधान यांचे महत्त्व सांगितले. तसेच सार्वजनिक बौद्ध वंदना घेऊन मंडळाच्या नामफलकाचे अनावरण प्राथमिक कृषि संघ संचालक आनंदा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक दगडू आण्णा चेंडके, ग्राम पंचायत सदस्य सागर चेंडके, उत्तम चेंडके, सचिन खोत, जांबुवंत कांबळे, महादेव कांबळे, रविंद्र कांबळे, सोनल कांबळे, मारुती कांबळे, विलास माने, प्रभाकर कांबळे, संदीप कांबळे, अविनाश कांबळे, यावनाथ कांबळे व मंडळातील सर्व कार्यकर्ते तसेच सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन आशिष कांबळे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta