माजी नगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांचा उत्तम पाटील यांना पाठिंबा
निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे. अशा राजकारणाला नागरिक कंटाळले आहेत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. त्यामुळेच १८ ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आली आहे. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली असून मतदारसंघातील हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात असल्याचे मत बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर, नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार, नगरसेविका सुनिता गाडीवड्डर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उत्तम पाटील यांना पाठिंबा देत निवडून आणण्याचा निर्धार केला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात उत्तम पाटील बोलत होते. व्यासपीठावर युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विलास गाडीवड्डर म्हणाले, कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना उत्तम पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून सातत्याने समाज कार्य सुरू ठेवले आहे. या उलट आमदार मंत्री महोदय यांनी केवळ विकास कामांचा डांगोरा पिटला आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच हिशोब मागण्याची वेळ आली त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन उत्तम पाटील यांना पाठिंबा दिला आहे. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता प्रचार यंत्रणा राबविण्याचे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी उत्तम पाटील यांना निपाणी शहरात सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले.
माजी नगरसेवक दिलीप पठाडे, आनंदा नलवडे, राजेंद्र भगत, राजू घाटगे, शरद माळगे, राजेंद्र शेटके, रवी पाटील, माजी नगरसेवक मज्जिद सय्यद, पंकज गाडीवडर, अजित पोवार, किरण नागेश, मुस्ताक शिरकोळी, आदम बुदिहाळे, हसन मकानदार, मच्छिंद्र डवरी, नियाज खानापुरे, संजय माने, राजेंद्र कदम, संभाजी विटेकरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta