निपाणी (वार्ता) : येथील लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून वेगळा उपक्रम राबविला.
फाउंडेशनतर्फे नगरपालिकेच्या आवारातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये महात्मा फुले नगर मधील कबीर वराळे गुरुजी यांच्या प्रांगणामध्ये जयंती सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे जगदीश हेगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्मांना बांधून ठेवणारे भारतीय संविधान लिहिले. त्याची जपणूक करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक मोहन कांबळे यांनी मुलांच्यावर वाचनाचे संस्कार करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रल्हाद कांबळे, प्रा. अनिल पाटील, प्रदीप जाधव, कबीर वराळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. नामदेव मधाळे यांच्याकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप झाले.
सामाजिक कार्याबद्दल अजित बकन्नावर, गणेश जाधव, लक्ष्मी वाडकर, अलका कांबळे, विनायक माने, गणपती धरते, योगेश कांबळे, नरेंद्र कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. सागर कांबळे यांनी प्रास्ताविक तर विकी कांबळे यांनी आभार मानले. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta