ग्राम पंचायत सदस्यांचा निर्धार : प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
कोगनोळी : काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांना कोगनोळी गावातून भरघोस मताधिक्य देणार असा निर्धार ग्रामपंचायत सदस्यांनी केला. कोगनोळी तालुका निपाणी येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, प्राथमिक कृषी पत्तिन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, कोगनोळी गावातील ग्रामस्थ, महिला, युवक नेहमी काँग्रेसच्या मागे उभे राहिले आहेत. विधानसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत काकासाहेब पाटील यांना भरघोस मताधिक्य देऊन निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ, युवकांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा किरकोळ मतानी पराभव झाला. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व आप आपल्यातील भेदभाव बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार काकासाहेब पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुरुवार तारीख 20 रोजी सायंकाळी गाव सभा होणार आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह काँग्रेस नेतेमंडळीचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी काँग्रेस प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रकाश कदम, दिलीप पाटील, संजय खोत, संजय पाटील, तातोबा कागले, बशीर गडवाले, जहांगीर कमते, मन्सूर शेंडूरे, सिकदंर बागवान, समीर मोमीन, निसार भैरवाडे, आपासो माने, सचिन माने, विलास माने, दादासो माने, अनिल माने, नामदेव दाभाडे, महेश जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta