प्राचार्य डॉ. व्ही. एल. पुजारी : शिक्षक, विद्यार्थी संघाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : देवाने पालक आणि शिक्षक निर्माण केले आहे. त्यामुळे देव सर्वत्र असू शकत नाही. शिक्षक हेच विद्यार्थ्यांना उपदेश देतात. शिक्षकच भरकटले तर संपूर्ण समाज भरकटेल, असे मत प्राचार्य डॉ. व्ही. एल. पुजारी यांनी व्यक्त केले. येथील केएलई संस्थेच्या बी.एड महाविद्यालयाच्या २०२०-२२ वर्षाच्या शिक्षक- विद्यार्थी संघ कार्यक्रमाच उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य पुजारी म्हणाले, गुरु पदावर असणाऱ्यांनी प्रामाणिक असले पाहिजे. त्यांनी अधिकाधिक अभ्यास केला पाहिजे. प्रशिक्षणार्थीनी अधिक गुण मिळवल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. गुरूच्या पदावर असलेल्या शिक्षकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासात सहभागी व्हावे.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना पत्रकार चंद्रशेर चिनकेकर म्हणाले, ‘लोकशाही व्यवस्थेच्या जिवंतपणासाठी निवडणुकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शाळा- महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटना करून विद्यार्थ्यांना लोकशाहीची जाणीव पटवून दिली जाते. आता महिलांच्या सहभागाने जग हादरवून टाकण्याची ताकद महिलांमध्ये आहे. शिक्षकांनी मानवतेची मूल्ये अंगीकारून त्यानुसार शिकवले पाहिजे. तरच आपण एक चांगला समाज घडवू शकतो.
चिक्कोडीचे जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी शांताराम जोगळे यांनी, सर्वांनी यश मिळवणाऱ्यांच्या पंक्तीत उभे राहण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
प्रारंभी शिक्षक- विद्यार्थी संघटनेच्या सन २०२२-२३ च्या पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. बी.बी. पोलीस पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रा.व्ही. के. नाडुगेरी, एम.के. हंचिनाळ, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक दीक्षा, महिला प्रतिनिधी सावित्री बारगळे उपस्थित होते. व्ही. ए. कुंभार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta