रस्त्याची दुरावस्था : नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया
कोगनोळी : येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते भगवा सर्कल इथे पर्यंतचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे.
गेल्या दोन वर्षापासून याठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झाली असून त्या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न कोगनोळी येथील ग्रामस्थांना पडला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ग्रामपंचायतीपासून ते वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे रस्ता तयार करून मिळावा यासाठी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती किंवा हा रस्ता झाला नाही. यामुळे नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने या पडलेल्या खड्ड्यामध्ये मुरूम टाकून खड्डे भुजवले पाहिजे होते. पण ग्रामपंचायतीने देखील जाणून बुजून दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते भगवा सर्कल या ठिकाणी असणारा हा रस्ता गावातील मुख्य बाजारपेठेला जोडला जाणार असल्याने या ठिकाणी कायमपणे वर्दळ असते.
याठिकाणी सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी आदीसह आजूबाजूच्या खेड्यातील लोक बाजार करण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर असणारा टोलनाका चुकून कोगनोळी मार्गे जाणार्या वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. या ठिकाणी असणारा रस्ता खराब झाला असल्याकारणाने गावातून होणारी अवैध वाहतूक थोड्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोगनोळी येथील नागरिकांनी हा रस्ता तयार करून मिळावा यासाठी ग्रामपंचायतीला अनेक वेळा निवेदनही देखील दिले आहेत. पण हा रस्ता तयार होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या कामाकडे लक्ष देवून हा रस्ता लवकरात लवकर तयार करून मिळावा. अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
Check Also
प्रेम विवाह नाकारल्याच्या रागातून दोघांची हत्या
Spread the love निपाणी : प्रेम नाकारल्याचा राग मनात धरून तरुणाने प्रेम करणाऱ्या मुलीच्या आईची …