खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव लोंढा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या महामार्गाच्या चौपदीकरणाने सामान्य जनतेला मेटाकुटीस आणले आहे.
खानापूर तालुक्यातील प्रभनगरपासून ते लोंढ्यापर्यंत अनेक गावच्या शेतकरीवर्गाची जमिन या महामार्गाच्या चौपदीकरणाने काढून घेतली आहे. त्याचा मोबदला कमी प्रमाणात दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वर्गाने कोर्टात धावून जमिनीची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली आहे. अद्याप काही शेतकरी वर्गाला वाढीव रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाचा लढा सुरूच आहे.
शेतकरीवर्ग बरोबर आता टोला नाक्याचा स्थानिक वाहन चालकांना होणार भुर्दंड
खानापूर तालुक्यातील गणेबैलजवळ टोल नाका उभारण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील प्रभूनगर, निट्टूर, काटगाळी, इदलहोंड, सिंगीनकोप, माळ अंकले, झाड अंकले, गणेबैल, हत्तरगुंजी, डुक्करवाडी तसेच खानापूर शहरातून स्थानिक चार चाकी वाहनधारकांना दररोज ये-जा करावी लागणार, दिवसातून दोन गाड्या फिरणार त्यामुळे या स्थानिक वाहनधारकांना टोल नाक्याचा भुर्दंड रोजच भरावा लागणार काय? असा प्रश्न पडला आहे.
आतापर्यंत महामार्गात गेलेल्या जमिनधारकांना त्रास सहन करावा लागला. यापाठोपाठ आता स्थानिक चारचाकी वाहन टोल नाका झाल्याबरोबर त्रास होणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण टोलनाक्याचा दर खूपच वाढला आहे. त्यामुळे आणखीन महामार्गाचा त्रास नको.
स्थानिक चारचाकी वाहनधारकांसाठी पर्यायी व्यवस्था हवी
खानापूर तालुक्यातून महामार्गावरील गणेबैल टोलनाक्याजवळ अनेक खेड्यातून चारचाकी वाहन सतत ये-जा करणार. या वाहनांना गणेबैल जवळ टोलनाक्यावर पावती फाडावी लागू नये. यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक चारचाकी वाहनधारकातून होत आहे. तेव्हा टोल नाका सुरू होण्याआधी यावर विचारविनिमय व्हावा, अशी मागणी सर्वातून होत आहे.
