
विविध गड किल्ल्यासह कुडल संगम येथून ज्योत; शहर भव्यमय
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी विवेक ठिकाणी शिव बसव जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध गड किल्ले आणि कुडल संगम येथून युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या ज्योतींचे स्वागत करण्यात आले.
येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात संतोष घाटगे यांच्या पौरोहित्याखाली शिव पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर श्रीमंत दादाराजे देसाई सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत विजय बाबा देसाई सरकार यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संजीवनी पावले, पुनम साळुंखे, प्रेमा काजवे, दिपाली मोहिते, श्रीदेवी सव्वाशे, अंजना पोतदार, सुनीता आवटे, वंदना नागावकर यांच्यासह जिजामाता भगिनी मंडळाच्या महिलांनी पाळणा सादर केला.
मंत्री शशिकला जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील, उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांनी मध्यवर्ती शिवाजी चौकातील शिव पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी बाळासाहेब जासूद, उदय शिंदे, ओंकार शिंदे, विनायक वडे, विश्वास पाटील गोपाळ नाईक, नगरसेवक विलास गाडीवड्डर, संजय पावले, दत्ता नाईक, सुनील शेलार, दीपक सावंत, नितीन साळुंखे, विजय शेटके, विश्वास पाटील, दीपक इंगवले अभय मानवी, मुकुंद रावण, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, इंद्रजीत जामदार यांच्यासह आदिवासी शिवाजी चौक तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
—-
बसव सर्कल, महादेव मंदिर
येथील महादेव गल्ली मधील महादेव मंदिर मंदिर ट्रस्ट व समस्त लिंगायत समाजातर्फे जत्राटवेस येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धपुतळ्यास अभिषेक घालून मंत्री शशिकला जोल्ले, उत्तम पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुडलसंगमहुन बसवज्योत आणण्यात आली होती. त्याचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर महादेव मंदिरात मान्यवरांच्या हस्ते शिवबसव पुतळ्याचे पूजन झाले. त्यानंतर महिलांनी पाळणा सादर केला. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले, उत्तम पाटील, चंद्रकांत कोठीवाले व मान्यवरांच्या हस्ते शिव बसव पुतळ्याचे पूजन झाले. सुंठवडा वाटपाने बसव जयंतीची सांगता करण्यात आली.
यावेळी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, नगराध्यक्ष जयवंत भाटले माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, चंद्रकांत तारळे, श्रीमंत दादाराजे देसाई, सुरेश शेट्टी, संजय मोळवाडे, राजीव गुंदेशा, संतोष सांगावकर, प्रणव मानवी, विलास गाडीवड्डर, महेश दिवाण, रवींद्र कोठीवाले, मल्लिकार्जुन गडकरी, रवींद्र चंद्रकुडे, महेश दुमाले, वज्रकांत सदलगे, डॉ. एस. आर. पाटील, रावसाहेब वसेदार, प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, मृगेंद्र कल्याण शेट्टी, राजू ननदीमठ, सदाशिव चंद्रकुडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta