Wednesday , December 10 2025
Breaking News

प्रा. सुभाष जोशी यांची निष्ठा धन, दांडग्याशी

Spread the love

 

काकासाहेब पाटील ; आप्पाचीवाडी येथे प्रचाराचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : राजकीय वाटचाल सुरू केल्यापासून आजतागायत आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून तळातून काम करत राहिलो आहे. पण अलीकडच्या काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होत आहे. या काळात माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी आपल्याला एक वेळ सहकार्य केले होते. पण त्यांची निष्ठा बदलली असून धन दांडग्याशी निष्ठा ठेवल्याचे मत भारतीय काँग्रेस चे उमेदवार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ मंदिरात रविवारी (ता.२३) सकाळी झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, भाजपने देशाचे वाटोळे केले आहे. तर आपल्या कारकिर्दीत काळमवाडी करारासह अनेक शाश्वत कामे केली आहेत. राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे देशात काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाल्या असून तेच वातावरण निपाणी मतदारसंघात आहे. स्वतःच्या विकासासाठी काहीजण आमदार होण्यासाठी रिंगणात आहेत. आपण मात्र सर्वसामान्यांच्या कामासाठी निवडणूक लढवीत आहे. वाढती महागाई आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काँग्रेसची सत्ता येणे आवश्यक असल्याचे सांगितले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, विरोधकांनी कारखाने आणि बँकातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी बळजबरी करू नये. इतर कारखान्यांच्या तुलनेत दर देऊन शेतकऱ्यांचे कल्याण करा. कोणतीही टीका करा, परंतु काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रकृतीबाबत टीका करू नका. त्यांची प्रकृती ठणठणीत असून या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी लक्ष्मण चिंगळे, पंकज पाटील, राजेश कदम, राजेंद्र वड्डर, बसवराज पाटील, रोहन साळवे, अण्णासाहेब हवले, बक्तीयार कोल्हापूरे, किरण कोकरे, सुमित्रा उगळे, आर्या मेस्त्री, ॲड. सूर्याजी पोटले, शाहिदा मुजावर, बंटी पाटील, इरफान मुल्ला, संजय कांबळे, सचिन लोकरे, दिपाली श्रीखंडे, ॲड. प्रदीप पाटील, नितीन वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. बाबुराव खोत यांनी स्वागत तर कुमार माळी यांनी प्रस्ताविक केले. माजी आमदार प्रा सुभाष जोशी यांचे कट्टर कार्यकर्ते विनोद साळुंखे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काकासाहेब पाटील यांना पाठिंबा दिला.
यावेळी शंकरदादा पाटील, दत्तकुमार पाटील, कांतीलाल राठोड, दत्ता पाटील, सुरेश घाटवडे, राजू पाटील, अशोक लाखे, शशी पाटील, लक्ष्मण हिंदलकर, अशोक आरगे, नवनाथ चव्हाण यांच्यासह निपाणी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीनिवास संकपाळ यांनी सूत्रसंचालन तर विश्वास आबणे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *