Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी मतदारसंघात भाकरी परतण्याची वेळ

Spread the love

 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील : आप्पाचीवाडी येथे प्रचार प्रारंभ
निपाणी (वार्ता) : राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठीचा गर्दीचा उच्चांक म्हणजेच उमेदवाराचा विजय आहे. हा पक्ष सर्वसामान्यांना घेऊन जाणारा असून कार्यकर्त्यांना न्याय आणि संधी देणारा आहे. निपाणी मतदारसंघात आता भाकरी परतायची वेळ आली असून मतदारांच्या पाठिंबामुळे उत्तम पाटील हे राष्ट्रवादीचे कर्नाटकातील पहिले आमदार होणार असून विधानसभेतील नेतृत्व करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ आप्पाचीवाडी येथे मंगळवारी (ता.२५) झाला. त्यावेळी पाटील बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून देश दहा वर्षे मागे गेला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅससह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून नागरिकांना जगणे मुश्किल केले आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात अनिश दाखवण्यासह अफवा सरविल्या जातील. त्यासाठी जागृत राहून मतदान करावे. उत्तम पाटील यांच्याकडे कोणतेही पद नसताना कोरोना महापूरसह आपत्ती काळात दिलासा दिलेल्या उत्तम पाटील यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी ठामपणे राहून त्यांना विधानसभेत पाठवा.
नावेद मुश्रीफ यांनी, कर्नाटकात यावर्षी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे खाते खोलणार आहे. त्यासाठी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उत्तम पाटील यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
उत्तम पाटील यांनी, कोणत्याही पदाची अपेक्षा न करता अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून पन्नास वर्षापासून समाजकारण सुरू आहे. कार्यकर्ते हीच शक्ती व आपला पक्ष आहे. त्यांच्या जोरावरच आपण निवडून येणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. सुभाष जोशी, नगरसेवक विलास गाडीवड्डर, राजू खिचडे, राजू आवळे, अशोककुमार असोदे, के. डी, पाटील, सुधाकर माने, राजवर्धिनी पाटील, नगरसेविका अनिता पठाडे, दिपाली गिरी, गोपाळ नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, विनयश्री पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे, राजकुमार सावंत, शुभांगी जोशी, शांती सावंत, राजू पाटील, शिरीष कमते, इम्रान मकानदार, गणी पटेल, जयवंत कांबळे, नारायण पठाडे, जावेद काझी, मदन कारंडे, अनिल यड्रावकर, दत्ता नाईक, संजय पावले, निरंजन पाटील, अरुण निकाडे,, रमेश भिवसे यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक बाळासाहेब देसाई यांनी स्वागत, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन तर नगरसेवक शेरू बडेघर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *