Share
धजदचा प्रचार प्रारंभ
निपाणी (वार्ता) : गेल्या १५ वर्षात निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानसभेला सुध्दा घेराव घातला आहे. ऐन दिवाळीच्या काळात आपणासह कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीत जावे लागले आहे. येत्या काळात शेतकऱ्यांची सेवा अधिक प्रमाणात करता यावी, या उद्देशाने विधानसभा निवडणूक लढवत असल्याचे धजदचे उमेदवार राजू पोवार यांनी सांगितले. येथे आयोजित धजदच्या प्रचार प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
धजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रताप पाटील यांनी, कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हायटेक मॉडेल सरकारी शाळा, आधुनिक संगणकी कृत विज्ञान प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय आधुनिक सभागृह, खेळाचे मैदान, मुलींचया शिक्षणाला प्राध्यान्य भविष्यासाठी पूरक क्रियाप्रकल्प, कुशल शिक्षणाचा मार्ग सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीचा प्रयत्न धजद तर्फे केला जाणार असल्याचे सांगितले. धजदचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष कल्लाप्पाण्णा मग्गेनावर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी निपाणी तालुका धजद अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर, राज्य महिला प्रधान कार्यदर्शी सुनिता होनकांबळे, जरारखान पठाण, कालगोंडा कोटगे, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, सुभान नाईकवडे, सोहेब पटेल, नामदेव साळुंखे, संजय पोवार, सागर पाटील, चिनु कुळवमोडे, रोहन नलावडे, एकनाथ सादळकर, शिवाजी वाडेकर, महेश पाटील, आ. एन. बेग, रमेश मोरे, मयूर पोवार, शिवानंद स्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
639