विविध गावाच्या मतदारांशी भेटीगाठी
निपाणी (वार्ता) : निधर्मी जनता दल व चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार हे निपाणी विधानसभा मतदारसंघातून निधर्मी जनता दल या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. यासाठी स्तवनिधी गव्हाण अंमलझरी यरनाळ या ठिकाणी मतदारांशी गाठीभेटी घेऊन आपल्याला भरघोस मतांनी निवडून आणण्याविषयी सांगितले. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू म्हणून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवलेले आहेत. आता देखील पंचरत्न योजनेच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी लोकांचे हित सांभाळण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यासाठी मला या भागातून निधर्मी जनता दलाची उमेदवारी मिळालेले असून कुमारस्वामी यांचे हात बळकट करण्यासाठी मला विधानसभेत पाठवण्याची मतदारांना प्रचाराच्या माध्यमातून विनंती केली.
यावेळी शिवाजी वाडेकर, संजय नाईक, उत्तम माडेकर, दिवाकर पाटील, पांडुरंग वाडेकर यांच्यासह निधर्मी जनता दलाचे पदाधिकारी, रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta