Friday , November 22 2024
Breaking News

अस्तित्वाच्या लढाईचा उद्या फैसला!

Spread the love

 

मतमोजणीची उत्सुकता शिगेला; कुणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ

निपाणी (वार्ता) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.१०) मतदान झाले. राज्यातील विधानसभेच्या २२४ जागांसाठी भाजपा, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने ही निवडणूक अस्तित्वाची बनवित आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. त्यामुळे या अस्तित्वाच्या लढाईचा शनिवारी (ता.१३) फैसला होणार असून त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता मतदार राजा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
निपाणी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या या निवडणूकीत सर्वच प्रमुख पक्षानी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात दिग्गज नेते मैदानात उतरले होते. शिवाय मोठमोठ्या पदयात्रा आणि कोपरा सभा गाजवल्या.
भाजपाच्या स्टार प्रचारकांनी मतदरांना बजरंगबलीच्या नावाखाली साद घातली होती. तसेच रोडशोच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघ कव्हर केले. काँग्रेसने केलेल्या चुका प्रचारात ठसठशीतपणे मांडण्याचा आणि त्या चुकांतून मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही केला. मतदारसंघातील विकास कामे सांगण्यावरही उमेदवारांनी भर दिला. त्याचा भाजपला कितपत लाभ होणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
कर्नाटक राज्यात यावेळी पुन्हा काँग्रेसला संधी मिळेल अशी पक्षातील नेत्यांना आशा आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील जनतेला ५ महत्त्वाच्या कामांची हमी दिली त्या जोरावरच निपाणीत येऊन त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला. मतदार संघात भाजपाच्या सरकारविरोधात जनमानसात असलेल्या लाटेचाही फायदा होईल, अशी आशा काँग्रेस नेते मंडळींना आहे. पक्षाने जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा, भाजपा सरकारने केलेला भ्रष्टाचार आणि महागाईचा मुद्दा यावर प्रचारात जोर दिला होता. भाजपाविरोधातल्या या लढाईत काँग्रेसने स्थानिक मुद्द्यांना अधिक महत्त्व दिले.
————————————————————-
कुणाचा करिष्मा चालणार?
निपाणी विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली आहे. उमेदवार उत्तम पाटील यांनी पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक लढवली आहे. कर्नाटकातील एकाही मंत्र्याचे पाठबळ नसताना केवळ महाराष्ट्रातील नेते मंडळी, यापूर्वी केलेले समाजात कार्य व कार्यकर्त्यांच्या जोरावरच त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे तीन वेळा विजय मिळवून हॅट्रिक साधलेले काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील, दोन वेळा विजयी झालेल्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्याशी थेट सामना केलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांचा करिष्मा चालणार का? हे आता उद्याच समजणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

Spread the love  बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *