डॉ. राजेश बनवन्ना; आम आदमी पक्षाची बैठक
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातचा दौरा केला. यावेळी मतदारांना आम आदमी पक्षाची ध्येय धोरणे पटवून दिली. पण या परिसरात हा पक्ष नवीन असल्याने पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. तरीही मतदारसंघातील विकास कामासाठी आपण आग्रह धरणार असून भ्रष्टाचार विरहिरीत मतदार संघाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा आम आदमी पक्षाचे निपाणी विभाग प्रमुख डॉ. राजेश बनवन्ना यांनी व्यक्त केली. सोमवारी (ता.१५) पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. राजेश बनवन्ना म्हणाले, या निवडणुकीत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. काँग्रेसने दिल्लीमधील विकास कामाचे मॉडेल घेऊन गॅरंटी कार्ड तयार केले होते. आपल्या पक्षाला पोस्टल मतदानही चांगल्या पद्धतीने झाले आहे. अनेक क्षेत्रात हजारो जागा रिक्त असून त्या भरल्यास सर्वसामान्यांची कामे सुरळीत पार पडणार आहेत. निपाणी मतदारसंघातील स्थानिक आमदारांनी भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढावा. कार्यकर्त्यांनीही या भ्रष्टाचाराबाबतीत सतर्क राहून भ्रष्टाचार खपवून घेऊ नये. यापुढील काळात मतदारसंघात आम आदमी पक्ष बांधणीचे काम निरंतरपणे सुरू राहणार आहे. चांगल्या कामांना पक्षाचा पाठिंबा राहणार असून भ्रष्टाचार होत असल्यास पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचे डॉ. राजेश बनवन्ना यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रा.कांचन बिरनाळे, लतिफा पठाण, राजु हिंग्लजे, वशिम पठाण, नंदकिशोर कंगळे, अक्षय कारवेकर, पृथ्वीराज कांबळे, महेश कंगळे, आदर्श गिजवणेकर, मिताली कंगळे, गिजवणेकर, सुशीला माने, दीपक शिंदे, सविता आवटे, यासीन बागवान, प्रल्हाद कांबळे, सदाशिव पोवार, दीपक कांबळे, प्रकाश पोळ, हसन मुल्ला यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta