Wednesday , March 4 2026
Breaking News

धर्मवीर संभाजी राजेंचे विचार समाजाला प्रेरणादायी

Spread the love

पृथ्वीराज पाटील : शिरगुप्पीमध्ये पोवाडा कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : धर्मवीर संभाजी राजे यांनी समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. प्रत्येक युवकांनी त्यांचे आचार विचार जपले पाहिजेत. तरच देशात खऱ्या अर्थाने शिवशाहीचे निर्माण होईल. संभाजी राजेंचे विचार समाजाला प्रेरणादायी आहेत, असे मत बोरगाव येथील पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले. शिरगुप्पी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धर्मवीर संभाजी महाराज तरुण मंडळातर्फे आयोजित पोवाडा कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरासह पाटील यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
त्यानंतर धर्मवीर संभाजी राजे यांच्या जीवनावरील पोवाड्याचे सादरीकरण झाले.
कार्यक्रमास अरुण जाधव, राहुल पाटील, विकास अस्वले, सुधाकर पाटील, रोहित पाटील, जितेंद्र तोरसकर, कृष्णा म्हाकवे, पांडुरंग हजारे, संतोष खराडे, जीवन तोरसकर, संदेश तोरसकर, ज्ञानेश्वर अस्वले, तुषार तोरसकर, वैभव तोरसकर, महेश अस्वले, कृष्णा अस्वले, नितीन अस्वले, राहुल अस्वले, विठ्ठल अस्वले, हर्षद अस्वले, किरण इंदलकर, प्रणित म्हाकवे, शशिकांत यादव, गणेश सुतार, प्रज्योत सुतार, साहिल सुतार, धनाजी सुतार, गणेश पोवार, ओंकार देसाई, सरदार देसाई, सागर देसाई, सुशांत रक्ताडे, स्वराज पाटील, प्रथमेश बोधले यांच्यासह मंडळाचे पदाधिकरी उपस्थित होते.

आप्पाचीवाडीमध्ये मिरवणूक
आप्पाचीवाडी येथील शाहू तरुण मंडळाच्यावतीने धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शिवाजी दादू पोटले तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत सदस्य किसन पोटले, भास्कर माने, संजय पोटले, मनिष माने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य ए. जी. माने यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून धर्मवीर संभाजीमहाराजांच्या कार्याला उजाळा दिला. तत्पूर्वी जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजता महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी रोहित माने, वैभव पोटले, अजय गारगोटे, सुयश माने, आदित्य खोत, चेतन तेली, प्रसाद पोटले, खंडू खोत, गणेश पोटले, सुरज तेली, गणेश माने, संग्राम पोटले, राजवर्धन माने, अभिजीत पोटले, नितीन माने, ऋषिकेश कुंभार, श्रीराम माने, सतिश पोटले, अजय माने, नवनाथ आबणे, प्रणव माने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *