निपाणी (वार्ता) : यरनाळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. त्यानिमित्त सायंकाळी आयोजित मर्दानी खेळांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी पन्हाळगड येथून आणलेल्या ज्योतीचे गावातील विविध मार्गावरून आणून मान्यवरांच्या हस्ते स्वागत झाले. त्यानंतर जन्म काळ सोहळा व पाळणा सादर करण्यात आला.
सायंकाळी रासायनिक शेंडूर येथील मुलींच्या जय भवानी लेझीम मंडळाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुलींनी नऊवारी साड्या नेसून हा खेळ सादर केला. यावेळी शांतीदूत मर्दानी आखाडा तर्फे मर्दानी खेळांचे चित्त थरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी सर्जेराव भोसले, गणेश पाटील, राजेंद्र चावरेकर, अभिजीत डावरे, अमित डावरे, अजिंक्य डावरे, आकाश मोहिते, शुभम काळे, अथर्व डावरे, गणेश शेळके, स्वप्निल तोरस्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta