राजेंद्र वडर – पवार, कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे असे आवाहन
निपाणी (वार्ता) : तालुक्यात काँग्रेस पक्षाला मिळालेली मते ही निष्ठावंत मते असून गेल्या विधानसभा निवडणुकी पेक्षा या निवडणुकीत काँग्रेसला जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता विकास कामात सदैव कार्यरत रहावे असे आवाहन राजेंद्र वडर पवार यांनी व्यक्त केले. ते गळतगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजेंद्र वडर पवार पुढे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत गळतगा येथून भाजप पक्षाला 1200 मते जादा मिळाली होती. पण यावेळी फक्त 200 मते जादा मिळाली आहेत. त्यामुळे गळतगा येथून कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत विकले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने विकास कामासाठी कार्यरत रहावे. कर्नाटकाट काँग्रेस सरकार एकहाती सत्ता मिळविले असून आता पर्यंत भाजप सरकारने एस, सी, एस, टी, आणि मुस्लिम समाजाच्या ज्या योजना थांबविल्या आहेत त्या योजना पुन्हा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात जे गॅरंटी कार्ड दिले आहेत त्या वरील सर योजनाची पहिल्याच बैठकीत मंजूर करण्यात येणार असल्याचे ए, आय, सी, सी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधीजींनी सूचना दिलेले आहेत. निपाणी तालुक्यात जे काँग्रेस पक्षाला मिळालेली मतदान झाले आहेत ते निष्ठावंत कार्यकर्त्यांचे असून भाजप व राष्ट्रवादीला मिळालेली मते हे विकत घेतलेली मते आहेत हे स्पष्ट असल्याचे सांगितले. आजपर्यंत निपाणी तालुक्यात ज्या ज्या ग्रामपंचायतवर सत्ता आहे त्या त्या ठिकाणी भाजपा पक्षाकडून राजकारण करून कामे तटविण्यात आलेली आहेत. पण यापुढे तसे न होता प्रत्येक गावाच्या विकासासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. राज्यात काँग्रेसने निर्विवाद सत्ता मिळविल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेत जाहीर केल्याप्रमाणे यापुढे विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यासाठी काँग्रेस पक्ष श्रेष्ठीनी काकासाहेब पाटील यांना महामंडळावर अथवा इतर महत्वाच्या विभागावर निवड करून मतदारांच्या अशा पुरवावे असे सांगितले.
भाजप सरकारने जे घरकुल योजना बंद केलेली आहे. ते काँग्रेस लवकरच सुरु करण्याचे अस्वासन सिदरामय्या यांनी सांगितले आहे. त्यामुळे गोरगरिबांना पुन्हा घरकुलांचा लाभ मिळणार आहे. गायरानात जे गोर गरीब आणि ज्यांना जागा नाहीत अशांना घरे बांधले आहेत. त्यांना पहिल्याच बैठकीत ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी यांच्याकडून जागा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली माजी ऊर्जा मंत्री विरकुमार पाटील, अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावांच्या विकास करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे राजेंद्र वडर पोवार यांनी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta