भाविकांची गर्दी ; पालखी मिरवणूक, महाप्रसादाचे वाटप
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात रविवारी (ता. २१) करण्यात आली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भावी उपस्थित होते.
शनिवारी सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री आठ वाजता सिध्देश्वर देवालयात वालंग जमवून श्रींच्या पालखीची मिरवणूक काढली. रविवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता श्रींच्या पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून ढोल वादनामध्ये मिरवणूक काढली. सायंकाळी ५ वाजता वाघापूर येथील सिद्धार्थ ढोणे महाराजांची भविष्यवाणी झाली.
यात्रेसाठी वालंग घेऊन येणाऱ्या प्रत्येक ढोलास १०१ रूपये व मानाचा फेटा, देवाची छत्री घेऊन येणाऱ्या संघास एका छत्रीस १२५ रुपये बक्षीस देण्यात आले.
यावेळी कमिटीचे अध्यक्ष अविनाश हजारे,कल्लाप्पा भानसे, पुंडलिक ढवणे, आप्पासाहेब बन्ने, मायाप्पा बन्ने, अण्णा हजारे, सत्याप्पा हजारे, जकाप्पा हजारे, शिवराम बोते, शंकर जानकर, लक्ष्मण जानकर, हालप्पा सौंदलगे, भीमा रानगे, वासू रानगे, कल्लाप्पा कोरे, आप्पाजी लवटे, मारुती लवटे एस. एस. हजारे, दत्ता लवटे, दत्ता हजारे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.
———————————————————-
सीमा भाग चर्चेत राहील
पावसाचे प्रमाण कमी जास्त असून अवेळी पाऊस पडेल. नवनवीन रोग झपाट्याने वाढतील. खून, दरोडे, चोऱ्या दिवसेंदिवस चालूच राहतील. साखरेचे दर कमी होऊन गुळाचे दर वाढतील. कोरोना नष्ट होऊन सीमाभाग चर्चेत राहील. यासह समाजातील विविध घडामोडीवर वाघापूर येथील सिद्धार्थ ढोणे महाराज यांनी भाकीत केले.
Belgaum Varta Belgaum Varta