मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प
कोगनोळी : येथील भगवा सर्कल जवळ मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना बुधवारी घडली. यामधुन महिला बचावली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून महिला अपघातातून बचावली. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशी म्हणण्याची वेळ अनुभवास मिळाली.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावर घडलेली हकीकत अशी की, ४० वर्षीय महिला पिठाच्या गिरणीतून दळप घेऊन मुख्य रस्त्यावरुन घराकडे चालली होती. येथील जनता पतसंस्थेजवळ आली असता वादळी वाऱ्यामुळे रस्त्याकडे असलेले जंगली झाड अचानक कोसळले.
झाडाच्या दोन्ही फांद्यामध्ये महिला सापडली. केवळ दैवबलवत्तर म्हणून तिला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यातून सुखरुपपणे बाहेर आली.
झाड कोसळलेल्या झाडाचा आवाज मोठा असल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. झाड कोसळल्यामुळे विद्युत पुरवठाही आपोआप खंडित झाला. मुख्य रहदारीचा रस्ता असल्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. केवळ महिलेचे नशीबच म्हणून बचावली. देव तारी त्याला कोण मारी अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकात होती.
Belgaum Varta Belgaum Varta