Wednesday , December 10 2025
Breaking News

मुकादमांच्या भुलथापांना बळी पडू नका

Spread the love
कोगनोळी येथे ऊस वाहतूकदारांची बैठक : फसव्या मुकादमाबाबत सविस्तर चर्चा
कोगनोळी : महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारे फसवे मुकादम कर्नाटक राज्यामध्ये आसरा घेऊन येथील ऊस वाहतूकदारांची फसवणूक करु नयेत. यासंदर्भात निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथे ऊस वाहतूकदारांची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. वाहतूकदारांसह मान्यवर सदर बैठकीला उपस्थित होते.
कर्नाटक सीमाभागातील ऊस वाहतूकदारांना एकत्रित करून स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या महाराष्ट्र-कर्नाटक समन्वय साधून महाराष्ट्रातील बरेचसे ऊस वाहतूकदार विजापूर, इंडी, बागलकोट, तांडे कर्नाटक हद्दीमध्ये टोळ्या करत असतात. सदर माध्यमातून राज्यामध्ये
मुकादमांनी फसवणूक केली आहे. त्या अनुषंगाने येथील पोलीस स्थानकाचे सहकार्य मिळावे. कर्नाटक सीमाभागातील ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाली आहे. त्या महाराष्ट्रातील मुकादमांच्यावरती कारवाई होण्याकरिता एकमेकांशी सुसंवाद राहणेही गरजेचे आहे.
या अनुषंगाने सीमाभागातील भव्य जागर मेळावा घेऊन उपस्थितीत बैठक पार पडली. अनेक ऊस वाहतूकदारांनी आपली व्यथा मांडत असताना स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या कार्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी आणि पृथ्वीराज पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले. येथून पुढच्या काळात स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटना बळकट करण्याच्या अनुषंगाने आणि फसवणूक झालेल्या वाहतूकदारांना न्याय देण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करु, अशी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक ग्वाही दिली. संघटनेची भूमिका स्पष्ट करण्याकरिता सीमाभागातील शेतकरी ऊस वाहतूकदार यांची चर्चा, भेटीगाठी करण्याच्या अनुषंगाने कोगनोळी येथे अरिहंत ग्रुपचे सर्वेसर्वा, स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे कर्नाटक राज्याचे प्रमुख संघटक राजगोंडा टोपान पाटील यांच्या उपस्थित बैठक झाली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष व सुकाणू समितीचे प्रमुख संदीप राजोबा, रावसाहेब आबदान, दिग्विजय जगदाळे, प्रविणकुमार शेट्टी, विनोद पाटील, विठ्ठल पाटील, ऐनापूरे, मुरचुटे आदी प्रमुख मान्यवरांसह वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *