
निपाणी (वार्ता) : निपाणी-चिकोडी मार्गावर असलेल्या समाधीमठ परिसरातील रहिवासी चेतन संजय घंगाळे यांच्या मालकीचे बोलेरो पिक-अप वाहन अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीसात झाली आहे.
सन २०१४ सालचे मॉडेल असलेले सदर वाहन चेतन घंगाळे यांनी शनिवारी (ता.३) रात्री ११ च्या सुमारास आपल्या दारात नेहमीप्रमाणे पार्क केले होते. मात्र सदरचे वाहन रविवारी (ता.४) सकाळी लावलेल्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले. परिसरात त्यांनी वाहनाचा शोध घेतला. नातेवाईक, मित्र मंडळीकडेही चौकशी केली. मात्र वाहन आढळून आले नाही. त्यामुळे चेतन घंगाळे यांनी पोलीसात रीतसर फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे निपाणी शहर व उपनगरात दिवसागणिक घरफोडीच्या प्रकारात वाढ झाली असून आता चोरट्यानी त्या पुढे जाऊन वाहन चोरी चालवल्याने नागरिकांसह वाहनधारकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta