निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी शिवप्रेमीतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी इतिहास प्रेमी नागरिक चंद्रकांत तारळे यांच्या हस्ते पूजन झाले. नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या हस्ते शिव पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे व विजयराजे -देसाई सरकार यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन झाले.
यावेळी बाबासाहेब खांबे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदारांना एकत्रित घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या पराक्रमी वृत्तीने अनेक गड किल्ले जिंकले गेले आहेत. सध्याच्या युवकांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. चंद्रकांत तारळे यांनीही शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी रमेश पै, एम. बी. जाधव, जयराम मिरजकर, उदय शिंदे, प्रा. एन. आय. खोत, सुरेश भोसले, बाळासाहेब कळसकर, नंदकुमार कांबळे, रमेश निकम, पिंटू सूर्यवंशी, सुरज पोटले, पंकज खटाव, संतोष पाटील, शितल बुडके, सुनील जामदार, संतोष चव्हाण, उमेश भिसे, अशोक हावळ, बाबासाहेब सुतार, भालचंद्र कांबळे, जयवंत पाटील, धर्मा यादव, धोंडीबा पोवार यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta