बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
निपाणी : कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर १९० बी, १,२ या ठिकाणी २००१ साली एनए- केजेपी होवून देखील आज अखेर रस्ता, गटार, पथदिप अशा कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत. त्याचबरोबर धारवाड लेआऊटचे नियम बदलून चिकोडी येथे दुसरा लेआऊट तयार करून ९ मिटर रस्त्यापैकी ३ मिटर रस्ता प्लॉटमध्ये वाढ करून ९ फूट बाय १५ फूटाचे प्लॉट ९ फूट बाय १८ फूट बनवून सरकारची मालमत्ता लाटून जनतेसह सरकारची देखील फसवणूक करण्यात आली आहे.
या करीता जानेवारी २०१५ पासून सार्वजनिक सुविधांच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी बेळगाव यांचेकडे सर्व रहिवाशांच्या वतीने तक्रार नोंद केल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याच सुविधा न मिळाल्यामुळे १३/३/२०२३ ला पुन्हा मा. जिल्हाधिकारी यांना सर्व कागदपत्रे देऊन पेपर पुन्हा पोच घेतली होती. त्याचे उत्तर म्हणून मा. जिल्हाधिकारी यांनी मा. तहसिलदार निपाणी यांना चौकशी करून रिपोर्ट करण्यास सांगितले होते.
शनिवार दि. ३/६/२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मा. तहसिलदार यांच्यावतीने रविकुमार मदली सर्कल निपाणी यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून सर्व नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे तसेच बेकायदेशीर कामावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta