अर्धा भाग चोरट्यांनी पळवला : चार पैकी दोघेजण पोलिसांच्या ताब्यात
निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना दोन महिलांचा पाठलाग करून चार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन तोळ्याचे गंठण चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी आरडाओरडा केल्याने दोन जण पोलिसांच्या ताब्यात तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पळून जाताना गंठणचा अर्धा भाग चोरांनी घेऊन पोबारा केला. गेला तर अर्धा भाग महिलांच्या हातात राहिला. महिलांनी आढावडा केल्याने नागरिकांनी पाठलाग करून पोलिसांच्या सहकार्याने दोघांना पकडले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणी चालू केली असून पळून गेलेल्या दोन जणांचा तपास चालवला आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, हिटणी येथील ज्योती पाटील, वनिता मोहिते या ननंद भावजय बाजार करण्यासाठी निपाणीत आल्या होत्या. बाजार करून बसस्थानकावर आले असता बस मध्ये बसत असताना चार चोरट्यांनी ज्योती पाटील यांच्या गळ्यातील सव्वातीन तोळ्याचे गंठण हिसडा मारून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्योती पाटील यांनी गळ्यातील गंठण पकडल्याने अर्धा भाग त्यांच्या हातात तर अर्धा भाग चोरांच्या हातात लागला. त्यांनी तात्काळ आरडाओरड केल्याने नागरिकांन व पोलिसांनी पाठलाग करून दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी सुरू केली आहे. ज्योती पाटील यांच्या फिर्यादीनुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Belgaum Varta Belgaum Varta