कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रमचे संस्थापक अमर पोवार व संचालिका शुभांगी पोवार यांना कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
5 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या निवडीचे पत्र नुकतेच माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना क्रांतिसूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल मोरे म्हणाले, भटक्या निराधार लोकांची सेवा करणारे भारतीय समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे अमर पोवार व शुभांगी पोवार यांची दखल घेऊन क्रांतिसूर्य फाउंडेशनने समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
यावेळी क्रांतीसुर्य फाउंडेशनचे उपाध्यक्ष योगेश दाभाडे, बबलू कांबळे, सनी आवटे, बुद्धिराज घस्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
Spread the love आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …