इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : निपाणीच्या अविनाश मानेचे यश
निपाणी : अनेक बालकांमध्ये विविध कौशल्य भरलेली असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याच्या विकासाला चालना दिल्यास नक्कीच यशाला गवसणी घालण्यास मदत होते. असाच निपाणी येथील 3 वर्षीय बालक अवनीश माने याने केवळ दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे सांगितली. त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेऊन मेडल आणि प्रमाणपत्र बहाल केले. शिवाय ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली असून या बालकाचे कौतुक होत आहे.
निपाणीचे रहिवासी असलेल्या प्रभाकर माने यांचे पूत्र प्रमोद माने हे नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास असतात. त्यांचा मुलगा अवनीश माने हा पुण्यातील सरहद्द पूर्व प्राथमिक शाळेत शिकत आहे. अवनीश माने या अवघ्या 3 वर्षीय मुलाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने निपाणीच्या नावलौकिकात भर पडली आहे.
अवनीश माने याने अतिशय लहान वयात आणि खूप कमी वेळेत म्हणजे दोन मिनिटांमध्ये 111 प्रजातीच्या प्राण्यांची नावे सांगून एक विक्रम केला आहे. लहानपणापासून टीव्हीवर देखील केवळ ऍनिमल प्लॅनेट, डिस्कवरी चॅनेल पाहण्याचा छंद असलेल्या या बालकाने मिळवलेल्या या यशामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेऊन प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविले.
या यशासाठी अवनीशला त्याच्या आई-वडिलांसह आजोबांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. अवनीशचे वडील प्रमोद माने एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असून आई स्वाती माने या प्राध्यापिका आहेत. अवनीशच्या या यशामुळे सरहद्द पूर्व प्राथमिक शाळेसह निपाणी परिसरातून कौतुक होत आहे.
Check Also
यमगर्णीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून
Spread the love सौरभच्या फसवणुकीचा राग; हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी(वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील …