निपाणी (वार्ता) : नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षा निकालात अकोळ हायस्कूल अकोळ येथील विद्यार्थिनी सृष्टी रणदिवे हिने ९६.४० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला होता. या विद्यार्थिनीने केलेल्या फेर गुण तपासणी अंतर्गत विज्ञान व समाज विज्ञान विषयात १० गुण जादा प्राप्त झाल्याने तिने ९८.०८ टक्के गुण घेऊन प्रशालेत प्रथम तर निपाणी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शाळेच्या प्रथमटप्प्यातील निकालात साक्षी प्रकाश कदम हिने ९७.७६ टक्के, अंकिता बाळासाहेब जाधव हिने ९६.४८ टक्के तर सृष्टी संजय रणदिवे हिने ९६.४० टक्के गुण अनुक्रमे क्रमांक पटकावले होते. दरम्यान सृष्टी संजय रणदिवे हिने फेर तपासणींची मागणी केली होती. त्यानुसार फेर तपासणीत तिला १० गुण जादा मिळाल्याने ती प्रशालेत प्रथम आली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक एस. ए. संद्रे यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta