कोडणी हद्दीतील प्रकार : जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार
निपाणी (वार्ता) : शहराला लगत असलेल्या कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर १९०बी, १ आणि २ या ठीकाणी २००१ साली एन एस केजीपी होवून देखील आज पर्यंत रस्ता, गटार, ट्रान्सफॉर्मरसह पथदीप अशी कोणत्याही प्रकारची कामे केलेली नाहीत. तसेच धारवाड लेआऊटचे नियम बदलून चिकोडी येथे दुसरा लेआऊट तयार करून ९ मिटर रस्त्यापैकी ३ मिटर रस्ता प्लॉटमध्ये वाढवून ९ मिटर बाय १५ मिटरचे प्लॉट ९ मिटर बाय १८ मिटर बनवून सरकारची मालमत्ता लाटून जनतेसह सरकारची देखील फसवणूक केली आहे. याशिवाय प्लॉट मालकांनी अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे मुरूम उकरून अनेक मोठमोठे खड्डे पाडल्याचा आरोप बालाजी नगरातील रहिवाशांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे.
बालाजी नगरातील रहिवाशांनी सुविधांच्या हक्कासाठी जानेवारी २०१५ पासून सार्वजनिक सुविधांच्या हक्कासाठी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार नोंद केली होती.त्यानंतर आजपर्यंत काहीच सुविधा न मिळाल्यामुळे १३ जून २०२३ रोजी याबाबतची पुन्हा एकदा माहिती कागदपत्रासह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निपाणी येथील तहसीलदारांना चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आदेशानुसार तहसीलदारां मार्फत सर्कल रवीकुमार मदली यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन देवून सर्व रहिवासी व प्लॉटधारकांना नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी बेकायदेशीर कामावर कारवाई करण्यासाठी अहवाल वरिष्ठाकडे पाठवणार असल्याचे सर्कल मदली यांनी सांगितले.
————————————————————-
फोन इन कार्यक्रमात तक्रार
बालाजी नगरातील रहिवाशांना नागरी सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून आठ वर्षापासून तक्रार देण्यात आली आहे. पण त्याबाबत कार्यवाही न झाल्याने अखेर शनिवारी (ता.१०) जिल्हाधिकाऱ्यांच्या फोन इन कार्यक्रमात येथील रहिवाशांनी या प्रकरणाची आठवण करून दिली आहे. यावेळी त्यांना येत्या चार दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक येऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta