निपाणी (वार्ता) : पद्मश्री सुलोचना दीदी यांना दादासाहेब फाळके मरणोत्तर पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने केंद्राकडे शिफारस करावी. हा पुरस्कार दीदीना मिळणे हा दोन्ही राज्याचा गौरव असल्याचे माजी सभापती राजन चिकोडे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
पत्रकातील माहिती अशी, कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशी दशकांच्या कालापर्यत मराठी, हिंदी, गुजराथी भाषेतील चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजविणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री पद्मश्री श्रीमती सुलोचना दीदी यांना मरणोत्तर तरी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन या महान कलाकारास न्याय मिळवून दिला पाहिजे. हा सन्मान म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा गौरव आहे. कारण दीदी यांची जन्मभुमी कर्नाटक तर कर्म भुमी महाराष्ट्र आहे. त्यासाठी भारत सरकारकडे या दोन्ही राज्यांनी पद्मश्री सुलोचना दीदी यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी राज्याच्या वतीने करावी. या आशयाचे निवेदन माजी सभापती निपाणी नगर पालिका प्रा.राजन चिकाेडे यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.
मराठी चित्रपटातच नव्हे तर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक जीवनात सुलोचना या नावाबद्दल अथांग आपुलकी व आदर आहे. निपाणी पंचक्रोशीची ही सुकन्या खडकलाट सारख्या ग्रामीण भागातून करवीर नगरीत जावून दीदीनी चित्रतपस्वी गुरूवर्य भालजी पेंढारकर यांच्याकडे अभिनयाचे धडे घेतले. जवळ जवळ चारशे चित्रपटातून मराठी मातीतील शालीनता, घरदांज अभिनय व सोज्वळतेचा चेहरा चित्रजगताला दिला आहे.
भारतीय सिनेसृष्टीच्या शंभर वर्षे इतिहासाच्या दीदी तब्बल ७० ते ८० वर्षीच्या साक्षीदार आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांचे गुरूवर्य भालजी पेंढारकर यांना मिळाला आहे. तेव्हा त्यांच्या शिष्येलाही हा सन्मान मिळावा अशी अनेक रसिकाची अनेक वर्षापासून मागणी आहे. या साठी भारत सरकारकडे वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न हाेत आहेत. पण दिल्ली दरबारी आज पर्यंत दखल का घेतली नाही, यांचे आश्चर्य वाटते. तेव्हा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रसिकांच्या वतीने केंद्र सरकारकडे दीदींना मरणोत्तर चित्रपटसृष्टीतील मानाचा हा पुरस्कार देवून त्याच्या चित्रपट सृष्टीतील कार्याचा गौरव करावा अशी विनंती निवेदनात केली आहे.
—————————————————————–
देशभक्तीसह सामाजिक बांधिलकीचे दर्शन
चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत वावरताना १९७१ साली चिनी आक्रमणावेळी भारत सरकारच्या आवाहनानुसार संरक्षण कार्यासाठी स्वतःचे दागदागीने व निधी उपलब्ध करुन देऊन आपल्या देशभक्तीचे, सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta