पडलिहाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम : परमात्मराज महाराजांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि लोकवर्गणीसह शासकीय निधीतून उभारलेल्या पडलिहाळ येथील काळभैरव जोगेश्वरी मंदिराचा वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या सोहळ्याला हर्दायन दत्त देवस्थानमठ आडीचे परमात्माधिकार परमात्मराज महाराजांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण कार्यक्रम पार पडले.
या निमित्ताने पडलिहाळ येथे दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांमुळे गावात उत्साहाचे वातावरण होते. रविवारी (ता.११) अंबली कलश मिरवणूक व श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. रात्रीभजन कळसारोहणानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
यावेळी आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, उत्तम पाटील, हालशुगरचे माजी उपाध्यक्ष राजू पाटील, रमेश भिवसे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गोविंद जाधव, संजय जाधव, हालशुगरचे संचालक समित सासणे, संजय स्वामी, सुनील जाधव, संभाजी पाटील, बाबासाहेब जाधव गजानन जाधव, रणजीत जाधव, गुंडू जाधव, विश्वास जाधव, किरण जाधव यांच्यासह कमिटीचे सदस्य भाविक ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, महिलांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta