निपाणी (वार्ता) : येथील सटवाई रोडवरील जीर्ण झालेली इमारत दोन महिन्यापूर्वी कोसळली आहे. त्यानंतर काही काळ दगड येथील मातीचे ढिगारे उपसण्यात आले. पण उर्वरित मातीचे ढिगारे तसेच पडून आहेत. शिवाय नळ कनेक्शन साठी काढलेले खड्डे तसेच असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. तर वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सटवाई रोडवरील जुन्या काळातील सीमा गेस्ट हाऊस इमारत अचानकपणे त्यामुळे इमारतीच्या दगड मातीमातीचे काही प्रमाणात ढिगारे उचलण्यात आले त्यामुळे रस्ता वाहतुकीस खुला झाला. पण अजूनही दगड आणि माती काही प्रमाणात रस्त्यावरच पडून असल्याने त्याच्या धुळीचा त्रास नागरिकांना होत आहे.
इमारत पडल्याने परिसरातील अनेकांचे नळ कनेक्शन खराब झाले होते परिणामी नागरिकांना पाण्या वाचून राहावे लागले. अखेर नागरिकांनी कनेक्शनसाठी रस्त्यावर खड्डे काढलेले आहेत. त्यामुळे काही अंतरावर रस्त्याची चाळण झाली आहे. याच रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसायिक आहेत. शिवाय अनेकांचे व्यापारी गोडाऊन असल्याने दिवसभर मालवाहतूक वाहनांची गर्दी पण रस्त्यावर काढलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत. परिसरातील नागरिकांना होणारा धुळीचा त्रास आणि खड्ड्यामुळे होणारे व वाहन धारकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले आहे पण त्याची दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तरी तात्काळ लक्ष देऊन टाळण्याची मागणी परिसरातील नागरिक आणि व्यवसायिकातून होत आहे.