निपाणी (वार्ता) : नुकत्याच झालेल्या मार्च- एप्रिल २०२३ दहावी परीक्षेच्या निकालानंतर मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे फेर तपासणीनंतर गुण वाढले आहेत. यामध्ये प्रतीक बापूगौडा पाटील याचे मातृभाषा इंग्लिशमध्ये एकूण ५ गुण वाढले असून आता त्याची एकूण टक्केवारी ९५.०४ अशी झाली आहे.
कार्तिक पांडुरंग पाटील याचे फेरमूल्यांकन नंतर एकूण ५ गुण व विज्ञानमध्ये १ गुण वाढला असून आता त्याची एकूण टक्केवारी ९४.५६ झाली आहे. आता शाळेच्या निकालामध्ये अमृता माने प्रथम, प्रतीक पाटील द्वितीय, कार्तिक पाटीलने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.