निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये हार्ट फुलनेस ऑर्गनायझेशन तर्फे तीन दिवसीय ध्यानधारणा प्रशिक्षण शिबिर पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे होत्या.
प्रारंभी लीलावती मेनसे यांनी स्वागत केले. प्राचार्या घाटगे यांनी ध्यानधारणेचे महत्त्व स्पष्ट केले. ऋतुजा देसाई यांनी, प्रत्येक व्यक्तीला दुःखमुक्त, पीडामुक्त, आजारमुक्त स्वस्थ जीवन हवे आहे. त्यासाठी ध्यान धारणेचे आकर्षण वाढत आहे. यामुळे लहान वयापासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच दररोज ध्यानधारणा केल्यास मन शांत राहून आत्मविश्वास, काम करण्याची प्रेरणा, शक्ती, यश, निरोग जीवन मिळते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण कामात गुंतला आहे. त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ कमी पडत आहे. परिणामी अनेक व्याधी निर्माण होतात. त्यापासून दूर राहण्यासाठी सकारात्मदृष्टीने ध्यान करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने सरावानुसार ध्यान केल्यास आनंदी जीवन जगणे शक्य असल्याचे सांगितले. शिबीरात विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग घेतला.