Tuesday , March 3 2026
Breaking News

‘अरिहंत’तर्फे सृष्टी खोत हिचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अंमलझरी येथील सृष्टी सुरेश खोत हिने दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल युथ गेम्स चॅम्पियन शिपमध्ये सिल्वर मेडल मिळविले आहे. त्यानिमित्त तिचा बोरगाव पिके पीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील व अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्ये दडली आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असून अशा विद्यार्थ्यांसाठी आपण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी निपाणी रोटरी क्लब अध्यक्ष दिलीप पठाडे, पप्पू शिंदे, शिरीष कमते, राजेंद्र कंगळे, विनोद व्हनशेट्टी, महेश पाटील, अभिजित कौंदाडे, अनिल संकपाळ, इम्रान मकानदार, सचिन खोत, संतोष मोरे, सोन्या कांबळे, राजू गुरव, बाळासो पाटील (गोल्डन बाबा), रावसाहेब यमकनमर्डे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *