Wednesday , December 10 2025
Breaking News

अविरत कष्ट, प्रामाणिकपणा हेच यशस्वी व्यवसायाचे गुपित

Spread the love

 

रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला; चिपरी फाटा येथे हॉटेल शुभारंभ

निपाणी (वार्ता) : कष्ट हे मानवी जीवनाच्या प्रगतीचे मुख्य माध्यम आहे. पण कष्टाला शास्त्राची आणि अध्यात्माची जोड असेल तर प्रगतीची गती अधिक वेगवान होते. कोणत्याही व्यवसायात माणसाने प्रामाणिकपणे सेवा दिली तर त्या व्यवसायाचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात होण्यास मदत होते, त्यामुळे आपला व्यवसाय प्रत्येकाने प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. असे मत निपाणी येथील प्रसिद्ध रत्नशास्त्री व शुभरत्न केंद्राचे सर्वेसर्वा ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले.
सांगली कोल्हापूर रस्त्यावरील चिपरी फाटा येथे नव्याने सुरू झालेल्या हॉटेल आमदार शिवनेरी या फॅमिली रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभ रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सरपंच निर्मला कोळी, सचिन कारकिले, संजय कावळे, रणजीत आवळे, यांच्यासह शिवाजी जगदाळे, सुनील जगदाळे उपस्थित होते.
ए. एच. मोतीवाला पुढे म्हणाले की, व्यवसायात सातत्य व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींची गरज आहे. आमचे वडील स्व. रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांनी सुद्धा आम्हाला हेच बाळकडू दिल्याने आज आम्ही चांगले काम करू शकलो आहोत. हॉटेल हा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. या सर्व गोष्टी जगदाळे परिवाराकडे आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्यवसाय नक्कीच मोठा होणार आहे. आज समाजामध्ये शेकडो लोक व्यवसाय करण्यासाठी प्रेरित होत आहेत. पण त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. पहिल्याच टप्प्यात यश मिळणे थोडे कठीण असते. यासाठी व्यवसायामध्ये टिकून राहणे, सातत्य ठेवणे व गुणवत्ता व प्रामाणिकपणा या गोष्टी जपणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टी जपल्या तर आपला व्यवसाय नक्कीच मोठा होऊ शकतो. जगदाळे कुटुंबियांनी सुरू केलेले हॉटेल हे या भागातील खवय्यांची पोटाचीच नाही तर मनाचीही भूक भागवेल असा विश्वास आहे.
जगदाळे कुटुंबीयांचे व मोतीवाला परिवाराचे पर्यायाने शुभरत्न केंद्राचे चांगले संबंध आहेत. शुभरत्न केंद्राचे संस्थापक एच. ए. मोतीवाला यांनीही जगदाळे कुटुंबीयांना वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन दिले आहे. सध्या सुरू केलेल्या हॉटेलला मोतीवाला परिवाराच्यां शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *