उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी; दोन्ही निवडी बिनविरोध
निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची बैठक शुक्रवारी (ता.२१) पार त्यामध्ये पुढील कालावधीसाठी अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे उपनिबंधक एस. एम. अप्पाजीगोळ यांनी काम पाहिले.
प्रारंभी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार संस्थेचे मावळते अध्यक्ष डॉ. शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी, आपल्यावर अध्यक्ष पदाची जवाबदारी सोपविली आहे. सर्वाच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या सहकार्याने पुढील काळात संस्थेचे ठेवी ७०० कोटी करण्याचे व कर्ज ५०० कोटी वितरणाची व नफा १५ कोटी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. संस्थेने सहकार क्षेत्रात चांगले काम केले आहे.संस्थेच्या ठेवी ४३२ कोटी, कर्ज ३३१ कोटी, स्वनिधी ४५ कोटी, गुंतवणूक १५३ कोटी, खेळते भांडवल ५०५ कोटी, वसुली ९५ टक्के, वार्षीक उलाढाल २८०८ कोटी, ८.३१ कोटी रूपयांचा नफा झाला आहे. याशिवाय सभासद व कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना राबविण्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे माजी उपाध्यक्ष किशोर बाली,संचालक प्रताप पट्टनशेट्टी, श्रीकांत परमाणे, महेश बागेवाडी, सदानंद दुमाले, अशोक लिगाडे, प्रताप मेत्राणी, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत अदन्नावर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta