
गुरुवार ठरला खगोलीय घटनेचा साक्षीदार ; अनेकांना घटनेचे कुतुहल
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील नागरिक गुरुवारी (ता. २२) एका सुंदर खगोलीय घटनेचे साक्षीदार ठरले. तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढल्याचा सुखद अनुभव विज्ञान प्रेमी नागरिकासह सर्वांनी घेतला.
गुरुवारी (ता. २२) दुपारच्या वेळी सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे गोल रिंगणतयार तयार झाले होते. जे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे होते. या गोल रिंगण प्रक्रियेला मराठीत सूर्याभोवतीचे ‘प्रभामंडळ’ असे म्हणतात. तर वैज्ञानिक भाषेत या घटनेला ‘सन हेलो’ असेही म्हटले जाते. जी एक सर्वसामान्य खगोलीय घटना आहे. अतिशय मनमोहक असे हे दृश्य पाहण्यासारखे असते.
निपाणी शहरासह परिसरातून हे दृश्य आकाशात पाहायला मिळाले. सूर्याच्या भोवती बनणाऱ्या सप्तरंगी कड्याचा मनमोहक नजारा दिसून आला.जेव्हा सूर्य पृथ्वीच्या २२ अंशात असतो, त्यावेळी आकाशात २० हजार फुटांवर सिरस क्लाऊडमुळे (आर्द्रता असलेले ज्यांचा थर पारदर्शक असतो) हे गोलाकार कडे बनते. सूर्य किंवा चंद्राची किरणे सिरस वर्गामध्ये असलेल्या हेक्सागोनल बर्फाच्या कणांच्या माध्यमातून परावर्तित होऊन ‘हेलो’ तयार होत असल्याचे खगोल प्रेमी नागरिकांनी सांगितले..
—————————————————————
‘सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे आजचे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. हे दृश्य दुर्मिळ आणि भव्य होते. वाता वरणातील बर्फाच्या स्फटिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे अपवर्तन, परावर्तन आणि विखुरण्यामुळे होते. विशेषतः सिरस ढंग किंवा बर्फाच्या धुक्यामध्ये बऱ्याच ठिकांनीऊ खगोलशास्त्रीय घटनेची छायाचित्रे घेतली. अनेकांना या असामान्य घटनेबद्दल कुतूहल आहे. भारतात किंवा जगात अन्य ठिकाणी अशा घटना अभ्यासल्या गेल्या.’
– एस. एस.चौगुले, विज्ञान शिक्षक, सिद्धेश्वर विद्यालय कुरली
Belgaum Varta Belgaum Varta