निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबिराची यरनाळ येथे सांगता करण्यात आली.
शिबिरात स्वच्छता अभियान, गटारु-रस्ते स्वच्छता, स्मशानभूमीची साफसफाई व सपाटीकरण करण्यात आले. कृषी पिकांबाबत जनजागृती, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती, ऐतिहासिक रामलिंग मंदिरातील स्वच्छता, ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाबाबत जनजागृती, घर घरपट्टीआणि पाणीपट्टी वेळेवर भरण्यासाठी घरोघरी जनजागृती, मोफत आरोग्य तपासणी. शिबिर व मोफत औषध वाटप, शालेय क्रीडांगण स्वच्छता, आपले आरोग्य आपले सर्वस्व जनजागृती, आई बाबांच्या पादपूजा असे विशेष र्कार्यक्रम पार पडले.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती, मतदानाचे महत्त्व, योग आहार आणि आरोग्य, प्रसारमाध्यमांचा तरुणाईवर होणारा प्रभाव, वारसा आणि संस्कृती, अन्न भेसळ, मी आणि माझा देश यांच्यातील भावनिक संबंध या विषयावर विशेष व्याख्याने झाली.
शनिवार (ता.२४) रात्री १२ वाजता यरनाळ मधील रमेश मधाळे यांच्या घरालाआग लागली. यावेळी एनएस एसएसअधिकारी डॉ. श्रीपती रायमाने यांनी दूरध्वनी वरून अग्निशामक दलाला माहिती दिल. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत एनएसएस शिबिरार्थींनी जीवाची पर्वा न करता आग विझवली. घरातील लोकांना धोक्यापासून वाचवण्याबरोबरच सिलिंडरचा स्फोट न होता त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या कार्याचे गावातील नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी कौतुक केले. ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील, सदस्य दिग्विजय निंबाळकर पाटील, आनंद संकपाळ यांच्यासह ग्रामस्थांनी शिबिरार्थींच्या कार्याचे कौतुक केले.
शिबिरासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, संस्था व युवक मंडळांच्या सदस्यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी कर्नाटक राज्य राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. कमलाक्षी तडसद केएलई संस्थेचे सदस्य अमर बागेवाडी, जी. आय. बागेवाडी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी, उपप्राचार्य डॉ. आर. जी. खराबे, एनएसएसचे समन्वयक प्रा. एस. एस. कुंभार, प्रा. एस. एस. शिंगटे, प्राध्यापक, विद्यार्थी, शिबिरार्थी, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एम. रायमाने यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta