प्राचार्या जी. डी. इंगळे; प्रा. नानासाहेब जामदार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : देवचंद महा विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. नानासाहेब जामदार हे मराठी विषयावर प्रभुत्व असलेले अभ्यासू व व्याकरणावर प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी महाविद्यालयात घडवलेले विद्यार्थी व महाविद्यालयासाठी दिलेला अनमोल महत्वाचे आहे. अशा प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीमुळे मोठी पोकळी निर्माण होत आहे. मराठी विषयाचे मुद्रितशोधन व प्रमाण लेखन यांच्यामुळे ते महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यांचा आदर्श आजचा विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा असल्याचे मत देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी व्यक्त केले.
अर्जुननगर (ता.कागल) येथील जनता शिक्षण मंडळाच्या देवचंद महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे मराठी विषयाचे प्रा. नानासाहेब जामदार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
जनता शिक्षण मंडळाच्या ज्येष्ठ संचालिका डॉ. अंजना कोठारी यांच्या हस्ते मानपत्र देऊन प्रा. जामदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ व वरीष्ठ मराठी विभाग आणि महाविद्यालयातील विविध विभाग व त्यांच्या मित्र परिवारान तर्फेही त्यांचा सत्कार झाला.
प्रा. जामदार यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पद्मभूषण देवचंदजी शाह तसेच स्वर्गीय किरणभाई शाह यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली तर विद्यमान अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या बद्दलही नम्रपणे ऋण व्यक्त केले. महा विद्यालयांमध्ये आपणास अध्यापनाची मिळालेली ही सुवर्णसंधी होती. त्याचे सोने करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे घडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सेवानिवृत्त होत असताना एक समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा. नानासाहेब जामदार यांनी प्रसिद्धी विभागात केलेल्या बातम्यांच्या कात्रणाच्या संग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. जी डी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. सीमा भागातील ज्येष्ठ मराठी कथाकार महादेव मोरे यांनी नानासाहेब जामदार यांच्या व्यासंगाचे विशेष कौतुक करून मराठी भाषेचे अफाट वाचन असलेला व्यक्ती असे त्यांचे वर्णन केले.
प्रा कृष्णामाई कुंभार, डॉ. रमेश साळुंखे, डॉ. तानाजी पाटील, चंद्रकांत जाधव, प्रा. अशोक डोनर, विजय देवदास, डॉ. रविंद्र दिवाकर, प्रा. नवनाथ कुंभार, प्रा. तुकाराम पाटील, प्रा. शिवाजी कुंभार, अमोल घोडके, कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय पाटील, उपप्राचार्य अशोक पवार, डॉ. एन. डी. जत्राटकर, प्रा. पी. जी. शाह यांनी मनोगतातून प्रा. नानासाहेब जामदार यांच्या मराठी भाषेवर असणाऱ्या कार्यशाळा व मुद्रित शोधाबाबतच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रभाकर जाधव, प्रा. आर. वाय. चिकोडी, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, प्रा. शिवाजी मोरे, प्रा. एस. टी. नाईक, प्रा. हेमंत पंडित, प्रा. के. डी. पाटील, कबीर वराळे, प्रा. आनंद संकपाळ प्रा. हिरेमठ प्रा. घाटगे यांच्यासह आजी-माजी प्राध्यापक संकपाळ प्रा. हिरेमठ प्रा. घाटगे, भारती जामदार
यासह आजी – माजी प्राध्यापक उपस्थित होते. स्टाफ वेल्फेअर कमिटीचे निमंत्रक डॉ. आनंद गाडीवड्डर यांनी स्वागत स्वागत केले. प्रा. सदानंद झळके यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अनिता चिखलीकर यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta