निपणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अजूनही शेकडे वर्षाच्या परंपरेनुसार महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साहात साजरा करण्यात निपाणी शहरापासून जवळच असलेल्या रामपूर येथे ही परंपरा अजूनही टिकून आहे. सोमवारी (ता.३) या गावात महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून या सणांमध्ये गावातील विविध तरुण मंडळासह संपूर्ण गावच सहभागी होत असल्याने या गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे. बेंदूर सणाच्या पहिल्या दिवशी रविवारी (ता.३) पाटील घराण्याच्या मानाच्या बैल जोडीला आंघोळ घालून त्यांचे खांदे तेलाने मळण्यात आले. शिवाय त्यांना विविध प्रकारच्या साहित्याने सजविण्यात आले.
सोमवारी बैलांची मनोभावे पूजा केली जाणार आहे. शेतकऱ्यांचा प्रामाणिक आणि कष्टाळू मित्र म्हणून बैलाला शेती शास्त्रात विशेष महत्व आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रामपूर येथे महाराष्ट्रीयन बेंदूर हा सण साजरा केला जातो. उर्वरीत निपाणी भागात बेंदूर सण जून मध्ये म साजरा करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता या बैलांचे पूजन करुन मिरवणूक काढली जाते. शेतकऱ्यांच्या सखा बैलाच्या प्रति संवेदना आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी कर तोडणे ही परंपरा जोपासण्यात आली आहे. कर तोडणे ही एक जुनी परंपरा असून आजही रामपूर गावांत ही प्रथा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी येथील रामलिंग मंदिरासमोर पटांगणामध्ये बनन्नीच्या शिऱ्या आणल्या आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास त्याचा ढिग रचूल त्यावर उंचीच्या ठिकाणी खोबऱ्याच्या वाट्या असलेली माळ बांधली जाणार आहे. त्यानंतर बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढून मानाच्या बैलजोडी द्वारे ही कर तोडली जाणार आहे. हा कर पाण्यासाठी रामपूर सह परिसरातील नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे या गावाला यात्रेचे स्वरूप येणार असून त्या दिवशी सायंकाळी पै, पाहुणेसह मित्र मंडळींना जेवणाचे आमंत्रणही दिले जाते. कर तोड नंतर रामगोंडा उर्फ पप्पू पाटील यांच्या निवासस्थानी मानाच्या बैल जोड्यांची ओवाळणी व पूजा करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta