निपाणी (वार्ता) : येथील साईशंकर नगरातील साई मंदिरात ओम श्री साईनाथ विश्वस्त मंडळातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा उत्साहामध्ये पार पडला. सर्व दोन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमात साईंच्या दर्शनासाठी पाणी आणि परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन श्री साईनाथ विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले होते.
रविवारी सकाळी सतीश पाटील-नांगनूर यांच्या हस्ते महाअभिषेक सायंकाळी ज्ञानेश्वर माने महाराज हेरवाड यांची प्रवचन सेवा झाली. यानंतर महादेव पाटील यांच्या हस्ते आरती झाली. विवेकानंद खटवकोप दाम्पत्याच्या हस्ते शेजारती करण्यात आली. रामचव्हाण दाम्पत्याच्या हस्ते महाभिषेक साईभव चव्हाण दाम्पत्याचे हस्ते श्रींची आरती, सामूहिक रुद्राभिषेक, पुंडलिक वागळे यांच्या अधिष्ठानाखाली साईचरित्र पारायण झाले. सुनील वरुटे दाम्पत्याच्या हस्ते श्रींची आरती झाली. साईनाम मंत्र गायन झाले.
सायंकाळी एकनाथ गुरव महाराज- मळगे बुद्रुक यांचे प्रवचन, किशोर गायकवाड यांच्या हस्ते धुपारती करण्यात आली. वसंत रांगोळी यांची भजन सेवा पार पडली. गायकवाड परिवारातर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta