Sunday , September 8 2024
Breaking News

निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण तारळे

Spread the love

 

उपाध्यक्षपदी राजेश तिळवे: एक वर्षासाठी निवड

निपाणी (वार्ता) : येथील निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण उर्फ विरु तारळे, उपाध्यक्षपदी राजेश तिळवे तर खजिनदारपदी श्रीमंदर व्होनवाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी केली आहे. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा रोटरी क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.
रोटरी क्लबच्या नूतन क्लब सेवा सस्यपदी राजेंद्र सदलगे, व्होकेशनल सर्विस सदस्य सचिन देशमाने, कम्युनिटी सर्विस सदस्य पदी महांतेश हिरेकोडी, इंटरनॅशनल सर्विस सदस्यपदी संजय नंदर्गी, न्यू जनरेशन सदस्यपदी आशिष कुरबेट्टी, सर्जंटपदी गजेंद्र तारळे, उपाध्यक्षपदी प्रवीण उर्फ अमर बागेवाडी, राजेश पाटील, सहसचिवपदी सुजय शहा, व्यवस्थापन सदस्य पदी सोमनाथ परमने, सभासद विकास सदस्यपदी सुहास प्रमणे आणि जनसंपर्क सदस्य पदी प्रमोद जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी नूतन अध्यक्ष प्रवीण तारळे म्हणाले, रोटरी ही समाजसेवा करणारी संस्था आहे. त्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व रोटेरियनच्या सहकाऱ्यांनी वर्षभर समाजाच्या हितासाठी विविध प्रकारची शिबिरे, औषधोपचार, वृक्षारोपण, जनजागृती गरजूंना मदत अशा कार्यावर भर दिला असल्याचे सांगितले. सेक्रेटरी राजेश तिळवे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दिलीप पठाडे, डॉ. सुनील ससे, आनंद सोलापूरकर, अमर बागेवाडी, डॉ. साईनाथ पाटील, रमेश पै, डॉ. अरुण पाटील, सोमनाथ परमने, सुबोध शाह, राजेश पाटील, प्रमोद जाधव, डॉ. महेश कोरे, राजशेखर हिरेकुडी, डॉ. संतोष खजन्नावर, संजय नंदर्गी, चेतन लगारे, वृषाली तारळे, डॉ. सुनिता देवर्षी, पुष्पा कुरबेट्टी, वर्षा नंदर्गी, डॉ. संदीप चिखले, सुजय शहा यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *