निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापण होऊन महिना लोटला नाही. इतक्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडलेले अर्थ संकल्प हे योग्य आणि जनसामान्य जनतेचा विचार करून मांडण्यात आलेले आहे. या अर्थ संकल्पआत कष्टकरी, शेतकरी, गोर गरीब आणि जनसामान्य जनतेचा विचार करून अर्थ संकल्प सादर करण्यात आले आहे. तो अर्थसंकल्प सर्वांनाच दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार -वडर यांनी दिली आहे.
वडर म्हणाले, आता पर्यंत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंत कर्ज देण्यात येत होते. ते आता पाच लाखापर्यंत वाढविल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहारामध्ये अंडी देण्यात येत होते. यापुढे पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन वेळा अंडी, दोन वेळा शेंगा चिक्की व दोन वेळा केळी देण्याचे संकल्प केला आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना बूट, सॉक्स, पुस्तक, गणवेश बरोबर सरकारी शाळेत असणारे शुल्क सरकारच भरून संपूर्ण मोफत शिक्षण देणार असल्याचे सांगितले आहे. डोंगराळ भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना शहरातील बाजार पेठेत आपली उत्पादने पुरविण्यासाठी अल्प संख्यातर विभागाकडून चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी ७ लाखापर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. याशिवाय निवडणुकीत जाहीर करण्यात आलेल्या पाच गॅरंटीची पूर्तता करत महिला आणि बाल कल्याण विभागाला २४ हजार कोटी रुपये वर्गीकर्ण करण्यात आले आहे. यामुळे जुलै पासूनच जाहीर करण्यात आलेले सर्व मासिक वेतन, अन्न भाग्य योजनेतील रक्कम आणि इतर सवलती जनतेला मिळणार आहे. काँग्रेस सरकार कडून अत्यंत चांगल्या प्रकारे अर्थसंकल्प सादर करून जनसामान्य जनतेचे हित जोपासले असल्याचे राजेंद्र पवार -वडर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta