कारखानदार, यंत्रमानधारकांचा इशारा : तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : कोरोना काळापासून औद्योगिक वसाहतीतील कारखानदार आणि तालुक्यातील यंत्रमाधारक विविध समस्यांनी अडचणीत आले आहेत. असे असताना गेल्या महिन्यापासून व्यावसायिक वीज दरात मोठी वाढ केल्याने कारखाने चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे कारखानदारांनी आपले कारखाने बंद केले आहेत. याबाबत शासनाला अनेक निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तात्काळ ही वीज दरवाढ मागे न घेतल्यास रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा औद्योगिक वसाहतीतील कारखानदार, कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाच्या निपाणी तालुका शाखा व यंत्रमागधारकांनी दिला आहे. याबाबत सोमवारी (ता.१०) तहसीलदार विजय कडगोळ यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती हेस्कॉम कार्यालय आणि मंडल पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक राज्य विणकर सेवा संघ
बांधकाम कामगार मॉडेलमध्ये कामगार सुविधा लागू करणे, विणकरांना मोफत वीज, संपूर्ण कर्जमाफी, यासह पावसाळी अधिवेशनात किमान १५०० कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी करणारी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. हक्क तरीही नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात विणकरांवर अन्याय आहे. राज्यभरातील विणकर आणि बाजारातील अस्थिरतेमुळे शास्त्रोक्त किमतीअभावी आर्थिक मंदीमुळे विणकर अंतिमत: विणकरांपर्यंत पोहोचण्यापासून वंचित राहत आहेत. आहे. १० अश्वशक्तीचे फक्त २५० युनिट्स, जोडलेले विणकर मोफत असतील. जे विणकरांसाठी अवैज्ञानिक आणि अन्यायकारक आहे. आणि इतर कोणतेही दावे पूर्ण होत नाहीत.४ जुलै रोजी बंगळूर येथील फ्रीडम पार्क येथे धरणे धरण्यात येणार आहे. शासनाने पूर्वीप्रमाणे वीज बिल आकारून या व्यवसायाला दिलासा द्यावा. अन्यथा यंत्रमानधारक देशोधडीला लागणार आहेत. त्यासाठी यावेळी शासनाने प्रतिसाद न दिल्यास आम्ही पुढील संघर्षासाठी तयार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी विणकर संघाचे अर्जुन कुंभार, मलकारी फराकटे, सचिन लष्करे, विक्रम कुंभार, प्रकाश पाटील, अमोल चंद्रकोडी, स्वप्निल मोरे, संदीप मगदूम, प्रकाश कागे, विलास यादगुडे, तानाजी कांबळे, देवेंद्र शितोळे, सुरज भोसले, महादेव जाधव, श्रीपेवाडी औद्योगिक वसाहती मधील रघुनाथ शेंडगे, स्वप्निल कमते, प्रवीण खवरे, इराण्णा स्वामी, विजय भारमल, विजय पाटील, वैभव गंथाडे, युवराज कांबळेसुरेश तांबेकर यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.
—————————————————————-
काँग्रेसच्या चिक्कोडी जिल्हाध्यक्षांना निवेदन
कर्नाटक राज्य विणकर सेवा संघ आणि श्रीपेवाडी औद्योगिक वसाहती मधील कारखानदारातर्फे वाढी वीज बिल कमी करण्याबाबत चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनाही निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चिंगळे यांनी निवेदन स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसह व मंत्र्यांशी चर्चा करून या संदर्भात तोडगा काढला जाणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta