कुर्ली सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये आयोजन; एस. एस. चौगुले यांनी केले मार्गदर्शन
निपाणी (वार्ता) : संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या भारताच्या चंद्रयान- ३ स्पेसशिप चंद्रावर उतरण्यासाठी शुक्रवारी (ता.१४) आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोव्दारे दुपारी २.३५ वाजता प्रक्षेपित करण्यात आले. त्याचे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. प्रक्षेपणानंतर काही वेळातच सॅटेलाईट व्हेहीकल पासून वेगळे झाल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जाहीर करताच विद्यार्थ्यांनी टाळयांच्या गजरात आनंद व्यक्त केला.
विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांनी चंद्रयान-३बाबत माहिती देतांना म्हणाले, चांद्रयान-२ मिशन २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित करण्यात आले. सुमारे २ महिन्यांनंतर, ७ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले विक्रम लँडर क्रॅश झाले. यासह चांद्रयानचा ४७ दिवसांचा यशस्वी प्रवास संपला. तेव्हापासून भारत चांद्रयान-३ मोहिमेची तयारी करत आहे.
चांद्रयान मोहिमेअंतर्गत इस्रोला चंद्राचा अभ्यास करायचा आहे. भारताने २००८मध्ये पहिल्यांदा चांद्रयान-१ चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. यानंतर २०१९ मध्ये चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणात भारताला अपयश आले. आता भारत चांद्रयान-३ लाँच करून इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे.
चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. हे मिशन यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक अतिरिक्त सेन्सर जोडण्यात आले आहेत. त्याचा वेग मोजण्यासाठी त्यात ‘लेझर डॉपलर व्हेलोसिमीटर’ यंत्रणा बसवण्यात आली आहे.
सीई-२० क्रायोजेनिक इंजिन, जे चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिक वरच्या टप्प्याला गती देते, उड्डाण तापमान चाचणीतही यशस्वी ठरले. याआधी, लँडरची चाचणी देखील यशस्वीरीत्या पूर्ण झाली होती.चांद्रयान-२ मध्ये या तीन मॉड्यूल्स व्यतिरिक्त, एक भाग ऑर्बिटर देखील होता.
इस्रोने चांद्रयान-३ साठी ऑर्बिटर बनवलेले नाही. चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आधीच चंद्राभोवती फिरत आहे. आता इस्त्रो चांद्रयान-३ मध्ये वापरले आहे.
चांद्रयान-३ मोहिमेसोबत विविध वैज्ञानिक उपकरणे पाठवली आहेत. त्यांच्या सहाय्याने चंद्राचा खडकाळ पृष्ठभाग, चंद्राचा भूकंपशास्त्र आणि चंद्राच्या पृष्ठभागाच्या प्लाझ्माचे थर्मल-भौतिक गुणधर्म आणि सभोवतालच्या चंद्रयान-३ थेट प्रक्षेपण माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta