युवा नेते उत्तम पाटील : निपाणीत मान्यवरांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात समाजासाठी काही तरी करण्याची भावना हळूहळू कमी झाली आहे. ही दुर्दैवी पण वस्तुस्थिती आहे. समाजात जन्म घेतल्यानंतर त्याचे ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून काम झाल्यास अपेक्षित असलेला सामाजिक विकास घडेल, असे मत बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. नानासाहेब जामदार हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल, प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. संजीवकुमार शितोळे यांची सरवडे येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल तसेच महावीर आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल प्रकाश शहा व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम पाटील बोलत होते. येथील ब्रह्मनाथ सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत गुडे होते.
प्रा. एन. आय. खोत यांनी प्रास्ताविक केले. प्रा.आनंद सकपाळ यांनी सत्कारमूर्तींचा परिचय केला. प्रा. जामदार यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या पुढील काळात निपाणी परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा टिकून राहावा, यासाठी आवश्यक लिखाण करणार असल्याचे सांगितले. प्राचार्य शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे साधन असून महाविद्यालयीन काळापासूनच शिक्षणासोबत सामाजिक चळवळीचा भाग बनल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य जी.डी. इंगळे, प्रकाश शहा, प्रशांत गुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. बोरगाव पिकेपीएसच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास प्रा. एन. डी. जत्राटकर, सामाजिक कार्यकर्ते सुरज राठोड, कबीर वराळे, राजीव रांगोळे, प्रसाद आवटे, संजय संकेश्वर, माजी नगरसेवक दिलीप पठाडे,तात्यासाहेब पाटील, विठ्ठल वाघमोडे, सुधाकर माने, बाबासाहेब मगदूम, प्रा. सुगम चव्हाण, प्रा. सुगम चव्हाण, प्रा. मनोज काळे, तात्यासाहेब पाटील, अझीज पठाण, प्रा. राजकुमार कुंभार, मंगलदास शिप्पूरकर, गोरखनाथ मधाळे, चंद्रकला संकपाळ, पल्लवी बेडकीहाळे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रा. नवजीवन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मधुकर पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta