कुलरत्नभूषण महाराजांचा बोरगावमध्ये आहारचर्या कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : अखंड विश्वाला अहिंसेचा मार्ग दाखवून जगा व जगू द्या असा संदेश देत, अहिंसा, अपरिग्रह विनय दया व त्याग या पंचतत्वातून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी जैन तिर्थंकरांनी दिलेले योगदान हे सर्व समुदायाला मार्गदर्शक असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांचा आहारचर्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नगरसेवक शरद जंगटे यांच्या नेतृत्वाखाली १०८ जैन दापत्यांच्या हस्ते मुनिंना आहार देण्यात आला. याप्रसंगी आमदार शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक शरद जंगटे यांनी, दिगंबर जैन श्रावक श्राविकांच्या सहकार्याने यावर्षी दोड्ड बस्ती येते सिद्धांत चक्रवर्ती संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री १०८ कुलरत्नभूषण महाराज यांच्या चातुर्मासाचे आयोजन केले आहे. ‘कर्नाटका केसरी’ म्हणून परिचित असलेल्या श्री १०८ कुलरत्नभूषणजी महाराज यांचे या ठिकाणी चातुर्मास होत आहे. पाच महिने चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी, जैन मुनि महाराजांचे मोठे त्याग आहे. जगाला शांतीचा संदेश देत समस्त मानव जातीच्या कल्याणा कल्याणासाठी मुनी महाराज हे चातुर्मास काळात प्रार्थना करीत असतात. श्री १००८ आदीसागर महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या बोरगाव नगरीत श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांचा चातुर्मास कार्यक्रम होत आहे. यामुळे परिसरात धार्मिकतेला प्राधान्य मिळाल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक शरद जंगटे, सुनील नांगरे पाटील, सुजाता लगारे, जिनेंद्र जंगटे, विद्या जंगटे, पूजा जंगटे, माहेश्वरी जंगटे, सीमा जंगटे निकिता खेमाने, संजय हावले भाऊसाहेब बंकापुरे, शिवाजी भोरे अजित तेरदाळे, भरत जंगटे, बाबासाहेब पाटील, बाबासाहेब चौगुले, बी. एस पाटील, रमेश मालगावे फिरोज अपराज, बिपिन देसाई, महावीर पाटील, जितेंद्र अम्मान्नवर, शितल हवले, ऋषभ हवले, सुभाष नरवाडे, राजू कोत्तलगे भरत नागावे, बाहुबली नागावे, जितेंद्र चोकावे महावीर चोकावे, भरत चौकावे, यांच्यासह ५६ कुमार व ५६ कुमारीकासह श्रावक, श्राविका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta