आडी ग्रामपंचायतीचा अनागोदी कारभारामुळे ग्रामस्थातून तीव्र नाराजी
हंचिनाळ (ता. निपाणी) : येथे ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून कर्नाटक शासनामार्फत दोन जलशुद्धीकरण केंद्र बसवण्यात आले आहेत परंतु त्यापैकी एक सुमारे दोन ते तीन वर्षापासून बंद पडले असून दुसरे मागील तीन महिन्यापासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्वरित दोन्ही जल शुद्धीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. हंचिनाळ, गाव. आडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येत असून गावची सुमारे चार हजार लोकसंख्या आहे त्यामुळे गावात व माळवागावर असे दोन जलशुद्धीकरण मशीन बसवण्यात आले आहे परंतु दोन्हीही मशिनरी बंद अवस्थेत असल्यामुळे. शुद्धीकरणाची व्यवस्था ‘असून खुळांबा नसून घात’ अशीच काहीशी अवस्था झाली आहे. शासनाने लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र सुरू केली परंतु ग्रामपंचायतीच्या अनागोदी. बेफिकीर. कारभारामुळे लोकांना स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही शुद्ध पाणी पिण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे.
गावात अध्यक्षासह आठ सदस्य असतानाही. गावाला कोणच वाली नाही का? असा सवाल सामान्य नागरिकातून विचारला जात आहे.
विशेष म्हणजे मागील सहा महिने गावात तापाच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. विशेष करून त्यामध्ये गॅस्ट्रो सदृश्य रुग्णांची संख्या अधिक असल्याचे लोकातून बोलले जात होते. आणि आत्ता पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असतानाही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करणे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे.
याबाबत बोलताना संतोष संकपाळ म्हणाले की, दोन्ही केंद्रात अमुकचा तमुकचा म्हणून भेदभाव करण्यापेक्षा दोन्ही केंद्र त्वरित सुरू करून देण्याची मागणी केली.
यासंदर्भात ग्रामपंचायतचे मावळचे अध्यक्ष बबन हवालदार म्हणाले की, काही तांत्रिक अडचणीमुळे केंद्र बंद होती त्यांची त्वरित दखल घेऊन जलद शुद्धीकरण केंद्र त्वरित सुरू करणार असल्याचे सांगितले. पीडिओ रामगौडा यासंदर्भात म्हणाले की, लक्ष घालून समस्या त्वरित मार्गी लावून देणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta